जादूची परी स्वप्नांतल्या दर्पणात मला मी स्वप्नसुंदरी भासते क्षणभर का होईना जादू करणारी परी असते मग काय पंख लावूनी आकाशात घेते मी भरारी दुःखी दिसेल जो कोणी तिकडे निघते माझी स्वारी जादूची काठी फिरवून लोकांचे दुःख सारते दूर मग त्यांच्या जीवनात येतो आनंदाचा महापूर स्वप्नांतल्या दर्पणाची गंमतच काही निराळी हसू आले गालावरी झोपेतून उठताना सकाळी मग मी उठून, स्वतःला आरशात जेव्हा पाहिलं स्वप्नांच्या दर्पणातील स्वप्न माझ्या डोळ्यांतच राहिलं - ज्योती किरतकुडवे (साबळे) ©Jk #dreamgirl #स्वप्नसुंदरी #जादूचीपरी #JKpoetess #jyotikiratkudve