Nojoto: Largest Storytelling Platform

*आठवतयं तिला आज* आठवतयं तिला आज सुरुवातीला किती

*आठवतयं तिला आज*

आठवतयं  तिला आज सुरुवातीला 
किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू...
ओघवतेपणाने...
मांडायचीस तिची वेदना...
दर्दी शब्दात...
कनवाळू अक्षरात...

प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं...
कारण ती इथून तिथून सारखी ना...!
 थोडीशी हळवी...
मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, 
प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची...
कधी तुझी प्रेयसी बनून...
कधी तुझी सखी बनून...
कधी तुझी प्रीत बनून...
कधी तुझी बहीण बनून...
कधी तुझी आई बनून...
आणि तुही आणायचासं आव
आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा...
उधळाचास शब्दांची फुले...
बांधायचासं अक्षरांची तोरणे...
त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग...
अन नजाकतीने पेश करायचास...
तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता...
आणि घ्यायचास टाळीवर टाळी...
प्रत्येक उच्छवासावर...
त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व,
श्रेष्ठ कविपद...
स्त्रीवादी कविपद...
अन बदलास तू...
तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ...
तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी...
तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी...
तिची स्त्रीसुलभ भावनाही
टाळीसाठी तू लिहलेली...
आता तुझी कविता ती वाचत नाही...
त्यात ती स्वतःला शोधत नाही...
शब्दाला दाद देत नाही...
 आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...?
तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री...
तुला प्रसिद्ध करणारी...


त्रिशिला साळवे
९११२८५९६६९ कविता जीवनाची
*आठवतयं तिला आज*

आठवतयं  तिला आज सुरुवातीला 
किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू...
ओघवतेपणाने...
मांडायचीस तिची वेदना...
दर्दी शब्दात...
कनवाळू अक्षरात...

प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं...
कारण ती इथून तिथून सारखी ना...!
 थोडीशी हळवी...
मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, 
प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची...
कधी तुझी प्रेयसी बनून...
कधी तुझी सखी बनून...
कधी तुझी प्रीत बनून...
कधी तुझी बहीण बनून...
कधी तुझी आई बनून...
आणि तुही आणायचासं आव
आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा...
उधळाचास शब्दांची फुले...
बांधायचासं अक्षरांची तोरणे...
त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग...
अन नजाकतीने पेश करायचास...
तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता...
आणि घ्यायचास टाळीवर टाळी...
प्रत्येक उच्छवासावर...
त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व,
श्रेष्ठ कविपद...
स्त्रीवादी कविपद...
अन बदलास तू...
तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ...
तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी...
तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी...
तिची स्त्रीसुलभ भावनाही
टाळीसाठी तू लिहलेली...
आता तुझी कविता ती वाचत नाही...
त्यात ती स्वतःला शोधत नाही...
शब्दाला दाद देत नाही...
 आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...?
तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री...
तुला प्रसिद्ध करणारी...


त्रिशिला साळवे
९११२८५९६६९ कविता जीवनाची