उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..! कुठवर आस तु धरशील या विकलेल्या वर्तमान पत्राशी गं.! रक्षण कोणते मागत आहेस.. भरलेत दु:शासन दरबारात गं..! स्वतः जे निर्लल्ज पडलेत ते अब्रु तुझी कशी वाचवतील गं..! उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..।।१।। काल पर्यंतचा आंधळा राजा आता मुका आणि बहिरा गं..! ओठ शिवलेत लोकांचे आहे कानावर पहारा गं..! तुच सांग ही अश्रु तुझी कोणाला काय समजवणार गं..! उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..।।२।। सोड मेहंदी आता बाहु संभाळ स्वतःचीच लज्जा वाचव गं..! डाव टाकुनी बसलेत शकुणी मस्तक सारे विकतील गं..! उठ द्रौपदी तुझे वस्त्र संभाळ आता कान्हा नाही येणार गं..।।३।। *अटलबिहारी वाजपेयी *मराठी अनुवाद श्री:किशोर ज्ञा.रोकडे.