Nojoto: Largest Storytelling Platform

••असे कसे..!•• तुझ्या विना मुळात मी, जगायचे असे क

••असे कसे..!••

तुझ्या विना मुळात मी, जगायचे असे कसे
उन्हास सावली तुझी ,म्हणायचे असे कसे

उदास वाटते मला,  नसेल तो  जिथे जिथे
उधाण आठवातले, जपायचे असे कसे

तरारते धरा अशी, सहून गर्भ वेदना
तृणात प्राण ओतता, फुलायचे असे कसे

मला न आवडे तुझा,उदास चेहरा असा
हसून दाखवीत मी, बघायचे असे कसे
 
मलाच ठेच लागते ,उगाच नेमकी तिथे
भरून घाव तू तिथे, दिसायचे असे कसे

हसायचे रडायचे, तुझ्या कुशित आज ही
तुझ्या शिवाय माउली, जगायचे असे कसे

उनाड पावसात त्या, शहारले किती किती
मिठीत स्पर्श जागता, झुरायचे असे कसे

अजाण भावना तिची, हुशार नाटकी सखा
सुरेख जाल टाकले,निघायचे असे कसे

अनाम साद सावळी, तुझीच येतसे मला
अधीर होत आज ही,पळायचे असे कसे

शब्दनक्षत्र

©Rohini Pande #रोही

#freebird
••असे कसे..!••

तुझ्या विना मुळात मी, जगायचे असे कसे
उन्हास सावली तुझी ,म्हणायचे असे कसे

उदास वाटते मला,  नसेल तो  जिथे जिथे
उधाण आठवातले, जपायचे असे कसे

तरारते धरा अशी, सहून गर्भ वेदना
तृणात प्राण ओतता, फुलायचे असे कसे

मला न आवडे तुझा,उदास चेहरा असा
हसून दाखवीत मी, बघायचे असे कसे
 
मलाच ठेच लागते ,उगाच नेमकी तिथे
भरून घाव तू तिथे, दिसायचे असे कसे

हसायचे रडायचे, तुझ्या कुशित आज ही
तुझ्या शिवाय माउली, जगायचे असे कसे

उनाड पावसात त्या, शहारले किती किती
मिठीत स्पर्श जागता, झुरायचे असे कसे

अजाण भावना तिची, हुशार नाटकी सखा
सुरेख जाल टाकले,निघायचे असे कसे

अनाम साद सावळी, तुझीच येतसे मला
अधीर होत आज ही,पळायचे असे कसे

शब्दनक्षत्र

©Rohini Pande #रोही

#freebird
nojotouser6099551520

Rohini Pande

New Creator