Nojoto: Largest Storytelling Platform

एका मनाची पानगळ तो उन्ह सावल्यांचा खेळ सुख दुःखाच्

एका मनाची पानगळ
तो उन्ह सावल्यांचा खेळ
सुख दुःखाच्या लपंडावात
गमावला आयुष्याचा मेळ...
जुने सोनेरी क्षण
ओंजळीतून निसटून गेले
जणू आठवणींचे मोती
तुटून विखरून गेले...
लहानपणी अंगणात झोपून
चांदण्या मोजत असताना
पाहिलाय चंद्र एकटाच
स्वतःच्या नशिबावर रडत असतांना...
तेव्हा कधीच कळले नाही
आपले चंद्राशी नाते
आपले ही आयुष्य असेच
कले कलेने विरघळते...
एका मनाची पानगळ इथेच संपत नाही...
सोबत घेऊन जाते
अनमोल दिवस काही... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
एका मनाची पानगळ
तो उन्ह सावल्यांचा खेळ
सुख दुःखाच्या लपंडावात
गमावला आयुष्याचा मेळ...
जुने सोनेरी क्षण
ओंजळीतून निसटून गेले
जणू आठवणींचे मोती
तुटून विखरून गेले...
लहानपणी अंगणात झोपून
चांदण्या मोजत असताना
पाहिलाय चंद्र एकटाच
स्वतःच्या नशिबावर रडत असतांना...
तेव्हा कधीच कळले नाही
आपले चंद्राशी नाते
आपले ही आयुष्य असेच
कले कलेने विरघळते...
एका मनाची पानगळ इथेच संपत नाही...
सोबत घेऊन जाते
अनमोल दिवस काही... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai