भावनांना बोल दिले जेव्हा, शब्दांचे वेचे घेऊन वाटलंच नव्हतं तेव्हा, हे ओढतील मज ताणून अताशा हे झालेत हुंदक्याचा, हर्षाचा जिव्हाळा आपसूक लेखणी मांडते, या हृदयातील उमाळा मला न कळे हे शब्द कोठून व कसे धावत येती ही वाणी केवळ गात असते मधुर तरन्नुम ओठी हवेतल्या धुक्यासारखे, मी गुंतले शब्दजंजाळी शब्दांचाच हा ताबा अन् मी शब्दांचीच आरोळी आता मी नाही; तर हे शब्दच माझेपाशी येतात हृदयाचा चिमटा घेत, हे शब्दच मला लिहीतात सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द