तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि खायला ऊठतं घर... हे एकटेपण सोडलं तर... बाकी सगळं ठीक आहे...! कधीतरी संध्याकाळी निघतो जेव्हा फिरायला... अनोळखी त्या गर्दीमध्ये होतं मला हरायला... वाटून जातं त्या क्षणी तू सोबत माझ्या असतीस तर... तेवढं झुरणं सोडलं तर... बाकी सगळं ठीक आहे...! रात्री असाच अचानक पाऊस लागतो पडायला... एक एक दिवा लागतो काळोखात बुडायला... तेव्हा कुशी नसते शिरायला ना मिळतो मायेचा पदर... तेव्हा तुझी कमी सोडली तर... बाकी सगळं ठीक आहे...! हल्ली मन कशातच रमत नाही जास्त... लोक म्हणतात या जगात कुणीच कुणाचं नसतं... पण लोक काय चोळतात च मीठ जखमेवर... फक्त... तुझा दुरावा सोडला तर... बाकी सगळं ठीक आहे... #अबोल_प्रेम ©Krushnarnav बाकी सगळं ठीक आहे... #आठवण #विरह #dusk