गोड दिसे निखळ हसे... आज मला लहान मीच आठवे। नव्हती तेव्हा कसलीच चिंता... मन भ्रमण करित असे अनंता। कही क्षण आठवून मनाला गुदगुल्या होतात... परत अनुभवायला मिळावेत ते निदान स्वप्नात। वाढदिवसाचा असायचा खुपच थाट... आठ दिवस आधी पासुनच व्हायचा बजारहाट। सुट्टीची तर मज्जाच होती न्यारी... कॉलनितली मित्र मंडळीच होती प्यारी। खोड्या केल्या तर बसायचे बोलणे... पण त्यामुळेच तर होतो आपण शाहणे। परत हवे ते दिवस गोजीरवाणे... आज मन गाई बालपणीचे गाणे। #लहानपण