Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्याप

आठवण काढू नको म्हणालास
तरी ते शक्य आहे का?
तुझ्यापासून वेगळं होवून
जीवनाला माझ्या अर्थ आहे का?
तुझ्यासारखं समजून घेणारं मला
दुसरं कोणी मिळेल का?
आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम, 
आपुलकी अन् काळजी मी त्याच्यात शोधू शकेल का?
मला मिळणारा तुझा आधार
आणि तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसऱ्यामध्ये सापडणार का?
तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला अर्थ असेल का?
कधीच ह्या गोष्टी होण शक्य नाही
कारण तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय
आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस,
मला कधीच मेसेज करु नकोस,
मला फोन पण कधी करु नकोस,
ब्लॉक करायची धमकी का देतोस,
तुला सगळं डिलीट केलेल प्रुफ का हवंय,
तुला फक्त माझ्या मेसेज-कॉलचा राग का येतो?
प्रेम अन् द्वेष दोन्हीही कसं करतोस,
अन् थोड्यावेळाने माफी मागतोस
असा का वागतोस...?
 असा का वागतोस....??
#uwots
#SharmilaS_Diary #असाकावागतोस #मराठीकविता #प्रेमकविता #uwots #Nojoto #marathipoetry #nojotopoetry #lovepoetry