तुला ठेवितो कोरून.. किती नीटसं निखळ तुझं ते कुंकवाच लेणं कुंकू कोरणारा हात चंद्र पाहतो मग तुजला रोज चोरून चिमुकल्या आरशात फक्त असे मनमोहक कपाळ दर्शन तुला कुठं हवी आहे सौंदर्याची रंगसंगती अन् निरनिराळी खुलवणं तुझ्या कुंकवाचा मांड सडा कसा कपाळ भरून अवकाळ अवदसा तो सडा बघुनी जाती लगेच पळून दुरून जसा उगवता सूर्य जणु तुझ्या भाळावरी आला त्याचा फाकला चंदेरी प्रकाश भोवताल सोनसळी हा सारा उजळला तुझा असा शिनगार मीही पाहतो रोज चोरून कविता करून हृदय प्रतिमेत माझ्या सोन्यासम तुला ठेवीतो कोरून ©शब्दवेडा किशोर #तुझंमाझंप्रेम