'तांडव कोरोनाचा' मृत्युच्या एका अनामिक भीतीने ग्रासलय तुम्हाला, मला आणि आपल्या संपूर्ण विश्वाला... कितीही तंत्रज्ञानाच्या गप्पा मारू दे माणसाने, आव्हान दिलंय सर्व मानवजातीला निसर्गाने एक विषाणू मृत्यूचे तांडव नृत्य करत आहे, त्याचे हे कृत्य भयभीत करून सोडत आहे सर्वांना.. चीन मधील अतिहाव्यासी मानव समूहाने नको नको ते खाऊन जिभेचे चोचले तेवढे शांत केले, त्यांच्या या कृत्याने निसर्ग कोप होऊन त्याची किंमत म्हणून मृत्यूचे पर्व सुरू झाले.. निसर्गाने मानवाला बुद्धी दिली सर्व सजीवांचे रक्षण करण्या, पण काही स्वार्थी समूह जिभेचे चोचले पुरविण्या सरसावले त्यांचे भक्षण करण्या.. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना विषाणू फोफावलाय नामोहरम करायला सकल सजीवांना, त्याचे हे रौद्र रूप म्हणजे मानवजातीला निसर्गाने दिलेली धोक्याची घंटा तर नसेल ना.. आज ना उद्या तो नक्की आटोक्यात येईल, मानव जातीला सुधारण्याची संधी देऊन जाईल.. #तांडव कोरोनाचा