आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! आठवते का ताई तुला मी लहानपणी तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! आठवते का ताई तुला मी लहानपणी सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! आठवते का ताई तुला मी लहानपणी किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... ! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..!