*अशी ही शांतता*...❤️ तू मला खूप आवडतेस... माझ्या मनातली गाणी फक्त तूच गातेस... तू मला ऐकून घेतेस , मला समजून घेतेस , माझ्या त्या गोड आठवणी फक्त तूच जपतेस... रोज मला भेटायला येतेस... कायम माझ्या सोबत असतेस... माझ्या मनातले बोल ओठांवर आणतेस... तू मला खूप आवडतेस... आयुष्य माझे आनंदी होते , जेव्हा तू माझ्या सोबत असतेस... डोळे मिटून फक्त तुझाच विचार केल्यावर...माझे मन तू तृप्त करतेस... तू मला खूप आवडतेस... कारण तू शांत आहेस...💞 - भुमिका मिलिंद *अशी ही शांतता...❤️🍂 #शांतता