Nojoto: Largest Storytelling Platform

कविता #लॉकडाऊन नको पुन्हा लॉकडाऊन आता नको पुन्हा

कविता
#लॉकडाऊन नको पुन्हा

लॉकडाऊन आता नको पुन्हा
बसेल रोजगारावर कुर्हाड
हातावर पोट असणार्यांनी
कुठे हलवावे त्यांचे बिर्हाड..

माझ्या शेतकर्याचा शेतमाल
आता बाजारात येत राहील
खुप खर्च केला त्याने त्यावर
पण लॉकडऊनने तो वाया जाईल..

नाही मिळाला जर रोजगार त्याला
ज्याचे सदैव हातावर आहे पोट
या लॉकडाऊनने होईल तो ञस्त
कशी जमवेल तो पोटासाठी नोट..!

जगाच्या पोशिंद्याचा विकावा 
उत्तम भावात शेतमाल
लॉकडाऊन पडले तर होईल
त्या मालाचा पुरता बेहाल..!
 
आता नको पुन्हा लॉकडाऊन
हि आहे आम्हा सर्वाची विनंती
आम्ही सर्व नियमांचे पालन करु
हेच सांगणे या कवितेअंती..!

कडक प्रतिबंध लावुन प्रसंगी
सॕनीटायझर मास्क करा कंपलसरी
पण नको आता पुन्हा लॉकडाऊन
हिच इच्छा सरकार,शासन दरबारी..!

लेखन
योगेश नरवडे
बीड

©Yogeshwar Narwade #WallTexture
कविता
#लॉकडाऊन नको पुन्हा

लॉकडाऊन आता नको पुन्हा
बसेल रोजगारावर कुर्हाड
हातावर पोट असणार्यांनी
कुठे हलवावे त्यांचे बिर्हाड..

माझ्या शेतकर्याचा शेतमाल
आता बाजारात येत राहील
खुप खर्च केला त्याने त्यावर
पण लॉकडऊनने तो वाया जाईल..

नाही मिळाला जर रोजगार त्याला
ज्याचे सदैव हातावर आहे पोट
या लॉकडाऊनने होईल तो ञस्त
कशी जमवेल तो पोटासाठी नोट..!

जगाच्या पोशिंद्याचा विकावा 
उत्तम भावात शेतमाल
लॉकडाऊन पडले तर होईल
त्या मालाचा पुरता बेहाल..!
 
आता नको पुन्हा लॉकडाऊन
हि आहे आम्हा सर्वाची विनंती
आम्ही सर्व नियमांचे पालन करु
हेच सांगणे या कवितेअंती..!

कडक प्रतिबंध लावुन प्रसंगी
सॕनीटायझर मास्क करा कंपलसरी
पण नको आता पुन्हा लॉकडाऊन
हिच इच्छा सरकार,शासन दरबारी..!

लेखन
योगेश नरवडे
बीड

©Yogeshwar Narwade #WallTexture