#माझे नमन तुजला श्री गजानना.... माझे नमन तुजला श्री गजानना विघ्नहरा तू सिंदुरवदना रे ऐक ही प्रार्थना सदैव लाभो कृपा तुझी रे गौरीहर नंदना संकटात तू झडकरी धावसी ऐकुनी आराधना तुझ्या पूजनी सरु दे जीवन विसर न व्हावा मना वेगवेगळी घेशी रुपे तू विश्वाच्या पालना आषिश लाभो तुझाच देवा माझ्या पापक्षालना वक्रतुंड नी तूंदिल तनू तव देशी जगा या चालना चंद्र हासतो भाळी तुझिया मूषक ये वाहना रक्तवर्ण ही फूले अर्पितो दूर्वा तव चरणा लोभसवाणे रुप तुझे हे साठवू दे लोचना प्रेमाने ही खीर अर्पितो मोदक हे सेवना तुझिया पायी लीन मला न मोक्षाची वांछना लोभसवाणे रुप तुझे हे साठवू दे लोचना सुख लाभू दे शाश्वत ऐसा वर दे कलीयुगी या जना भक्तांची रे साऱ्या बाप्पा पुरव ही कामना माझे नमन तुजला श्री गजानना....... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #गजानना_गणराया