Nojoto: Largest Storytelling Platform

दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस वेळ काळ नसतेच त्यास

दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस 
वेळ काळ नसतेच त्यास ठाव
रात्र सरता नि दिस ऊजाडता
कोरभर भाकरीचा त्यास भाव

ठिगळं फाटल्या मातीचे करी
हृदयास चिरांचे खोलवर घाव
कधी कधी बाप धीर गाळितो
पाहूनी क्रूर हा नियतीचा डाव

आभाळासी येता ओल हर्षतो
सरसरते अवचीत नयनी धाव
कुदाळ, पावडं, बीज, बियाणे
या स्नेह्यांनी फुलते त्याचे गाव

सकळांचे कष्ट सुफळी होवोत
जोडूनी करा वंदितो विश्वभाव
कुरवाळीत वात्सल्ये शेतमळा
धन्य धन्यतो अंतःकरणी श्राव नमस्कार मित्रानों.🙏
सुप्रभात.
काल राष्ट्रीय शेतकरी दिवस होता.
दिवस-रात्र कष्ट करणार्या बळीराजाला माझे कोटी कोटी वंदन.
चला तर मग आजचा विषय आहे
माझा अन्नदाता.
मस्त मस्त रचना येऊ द्या.
#माझाअन्नदाता हे टँग करायला विसरु नका. #शेतकरी
दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस 
वेळ काळ नसतेच त्यास ठाव
रात्र सरता नि दिस ऊजाडता
कोरभर भाकरीचा त्यास भाव

ठिगळं फाटल्या मातीचे करी
हृदयास चिरांचे खोलवर घाव
कधी कधी बाप धीर गाळितो
पाहूनी क्रूर हा नियतीचा डाव

आभाळासी येता ओल हर्षतो
सरसरते अवचीत नयनी धाव
कुदाळ, पावडं, बीज, बियाणे
या स्नेह्यांनी फुलते त्याचे गाव

सकळांचे कष्ट सुफळी होवोत
जोडूनी करा वंदितो विश्वभाव
कुरवाळीत वात्सल्ये शेतमळा
धन्य धन्यतो अंतःकरणी श्राव नमस्कार मित्रानों.🙏
सुप्रभात.
काल राष्ट्रीय शेतकरी दिवस होता.
दिवस-रात्र कष्ट करणार्या बळीराजाला माझे कोटी कोटी वंदन.
चला तर मग आजचा विषय आहे
माझा अन्नदाता.
मस्त मस्त रचना येऊ द्या.
#माझाअन्नदाता हे टँग करायला विसरु नका. #शेतकरी