त्याने करांची ओंजळ उघडली नी माझी धरतीशी नाळ जुळली एका शाश्वत हातातून एका मायेच्या हाती दोरी आली पण तो तर ,कायम सोबत होता कधी दिसत नव्हता पण अस्तित्व मात्र दाखवत होता, त्याच्या नावाची आंदोलने,त्यावर माझी स्पंदने माझी चालणारी पाऊले,त्यावर त्याच्याच नजरेचे असतात इमले तो असला की एक आधार असतो मग दुःखाचा डोंगर हि पार होतो त्याचा माझ्यातील अंतर म्हणता म्हणता तो तर अंतरातच राहतो त्याच्या माझ्यातील संबंध हा तर माझा अनेक जन्मीचा आहे बंध त्याच्याकडे जाण्यासाठी अनेक वाटा आहेत ,वेळा आहेत पण तो म्हणतो ,तुझे नी माझे संपेल अंतर ज्यावेळी तू सोडशील हा देह नश्वर,तो माझा नी मी त्याची हाच तर माझ्या अंतरीचा ईश्वर पल्लवी फडणीस,भोर✍