#मी आहे ना..so..Every thing will be fine.... आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाचंच आलेली नसतात.प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.कुणाशी कुणाचे तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का अन् कशी होते ? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी.आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे..रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं. It's mutual relation..मन जुळलं की आपलेपणाचं नातं तयार होतं.जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कुणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत.आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना" हे शब्द अगदी संजीवनी सारखे काम करतात.अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं सुद्धा खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं आणि मेन म्हणजे या जगात पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे अन् नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण.... शेवटी आपल्याला पैशाची श्रीमंती हवी की आपल्या हक्काच्या माणसांची अन् आपल्या हक्काच्या रक्ताने नाही पण कर्माने मिळालेल्या किंवा कमावलेल्या लोकांची.....ते आपणंच ठरवायचं असतं. Am I Right Frined's ???? @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव