#पायवाट गाभुळल्या त्या पायवाटा भूल पडे ती रानवेडी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी.. रानातली रानफुलं ओथंबून आली अंगावर हिरवी झुल दवारून गेली हळव्या पावलांना वाट लावी लाडीगोडी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी.. वर्दळीच्या वाटेवर फुलती ते जुन्या सुवर्णक्षणांच्या पावलांचे ताटवे ओठावर रेंगाळून गीत जुने आठवे सांडणाऱ्या आसवांना सांभाळते झाडी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी.. व्याकुळते मग ती पायवाट पुन्हा आपसुक संध्याकाळी सांभाळीत मग पावलांना वाट देते ती ओळखीची हाळी अंधारात एकटीची कुजबूज चाले मग थोडी थोडी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी.. आसमंत वेल्हाळुन बघा नव्यानं साद देतो पुन्हा काळजात साठवल्या पावलांच्या अस्तित्वखुणा रेंगाळून वाट पून्हा जुनी ती सुवर्णआठवण काढी अनोळखी पाखरांची चाले छेडाछेडी.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #पायवाट_प्रेमाची