●● *पक्ष्यांची सभा* ●● °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° पहाटेच्या गारव्यात सभा पक्ष्याची भरली, मोर राघू चिमण्यांची चर्चा फारच रंगली..!१ शिस्तशीर पक्षी सारे असे सभेत वागले, एका रांगेत बसून त्यांनी नियम पाळले..!३ तिथे मोरांच्या गटाने डौल न्यारा दाखविला, भोळ्या चिमण्यांकडून थवा राघुंचा बोलला..!४ खंड्या ,पारव्यांनी तिथे उगा शांतता राखली, चर्चा पक्षी सभेतली मग अर्धीच राहिली!५ मोर अध्यक्ष म्हणाला आता करू समारोप, पुन्हा भेटू नियोजना अन बोलू खूप खूप..६ सहभोजनाचा त्यांनी छान आस्वाद घेतला, चोचीतल्या खाद्यासवे मैत्रभाव ही जपला..७ © *रोहिणी पांडे, नांदेड* #शब्दनक्षत्र