आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत, त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली, आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरावर तिरंगा लावावा असं आवाहन केलं आहे. त्यामुळे या अभियानाचं नाव ‘हर घर तिरंगा’ असं आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आणि रेशनच्या दुकानात सुद्धा हा तिरंगा मिळणार आहे. शिवाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा राष्ट्रध्वज मागवू शकता.