#OpenPoetry रूसवा फुगवा सोडून यावे परतूनी तू मम जीवनात... वाट पाहत उभा राहिलो तुझीच वेडे मी अंगणात... मळभ दाटले काय मनात सांग ना तू माझ्या कानात... निरसन करेन तुझ्या शंकाचे चुटकी सरशी मी क्षणातं... नको धरू तू असा अबोला पिळून माझे हृदय निघते... दिसेनाशी होता तू सखे गात्र गात्र माझे शहारते... रोमा रोमात तूच गं वसली हृदयात तुजी छबी ठसली... नाका वरती धरून फुगवा का गं मजवरी अशी रुसली... अबोल झाल्यात घरभिंतीही विचार करते तुळसही चिंती... निघून गेलीस तू अन् इथून त्यांनाही वाटू लागली भिती... दूषणे देती सगळे मजला घायाळ केले त्यांच्या प्रश्नां... सोड राधिके तुझा रूसवा वाट पाहे यमुनेशी हा कृष्णा.... '''''''''''''''''''' अजित रुसवा