Nojoto: Largest Storytelling Platform

तिची वाट नेहमीच आडवळणाने जाणारी वेगळ्याच अशा जगाश

तिची वाट नेहमीच आडवळणाने  जाणारी
वेगळ्याच अशा जगाशी स्वतःच नातं सांगणारी
सगळ्यांना वाटे ही अशी कशी आहे वेगळी
आमच्यात असूनही आमच्यापेक्षा निराळी
कुणीतरी एकदा खोदून खोदून तिला विचारलंच 
काय चालू असतं ग त्या बंद दारामागे तुझं
दीर्घ श्वास घेऊन मंद हसून तिनेही सांगितलंच
माझ्या मनात चालू असतं एक द्वंद्व माझ्याशीच माझं
शोध घेण्यासाठी स्वतःचा, त्याचा आणि तुझाही
समोरची व्यक्ती नकळत पुटपुटली काहीबाही
मग ती बोलली पुढे असं काही
घाबरु नकोस मी काही तुमच्यात येणार नाही 
तुमची सरावाची चौकट मोडणार नाही
माझ्या दारामागच्या जगात खुश आहे मी
वेगळं तरीही समाधानी जग रोज अनुभवतेय
त्यांच्यात राहून सगळी स्वप्नं भरभरून  जगतेय
तुला कधी समजणार नाही माझी ही भाषा
उगाच माझ्याकडून ठेऊ नकोस चारचौघींसारख्या आशा
माझं आसमंत खुणांवत आहे मला कधीपासून 
आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून ... #तिची वाट