ओढ तुझी पांडुरंगा शीर्षक - वारी यंदाची चुकली धाव घेई पांडुरंगा भक्ती अंतरी कोंडली साथ कोरोनाची येता वारी यंदाची चुकली ||धृ|| ओढ तुझी पांडुरंगा माझ्या मनाला लागली आली बघा एकादशी पायी दिंडी ती निघाली ||१|| हरी नामाचा गजर टाळ, मृदंगी चालला अश्व, झेंडे, वीणा, माळ टिळा कपाळी लावला ||२|| डोई तुळशी घेऊन मुखी भजन म्हणते मागे सोडून संसार विठ्ठू भक्तीत दंगते ||३|| भेट होता ज्ञान तुका थांबे पालखी दर्शना गाता अभंग संतांचे देव नाचतो किर्तना ||४|| मुकी झाले रे पंढरी चंद्रभागा ही रूसली दुर रुख्मिणी ती उभी तुझी माया का? आटली ||५|| धाव घेई पांडुरंगा भक्ती अंतरी कोंडली साथ कोरोनाची येता वारी यंदाची चुकली ||धृ|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #vitthal , #Vari , #pandharpur