तेज मनाचे मज लाभू दे काळोखाच्या आधी मनातल्या मज अंधाराने छळावयाच्या आधी गालावरची खळी खुलावी तू हसताना राणी अधरावरची गोडी चाखू उजडायाच्या आधी कुणीतरी मज आवडले... हे कधीच नव्हते झाले बरा दुरावा काही भलते घडावयाच्या आधी उंच उडावे नभी फिरावे असे ठरविले होते पंख छाटले कोणी माझे उडावयाच्या आधी मैत्री केली माझ्यासोबत थोड्या स्वार्थासाठी विश्वासाच्या तुटल्या तारा जुळावयाच्या आधी हसणे रडणे दोन्ही नाणे आयुष्याचे येथे हसून घ्यावे पुष्कळ मनभर रडावयाच्या आधी पाया मध्ये पाय घातले कित्येकांनी माझ्या तरी पांगळी झाले नाही चालायाच्या आधी दान मिळाले आयुष्याचे आनंदाने जगण्या जगून घेऊ चल, मृत्युला भेटायाच्या आधीc ©Rohini Pande #रोही