असशील, तू सुंदर, पण एवढी घमेंड नाही बरी खरं प्रेम एकदाच भेटतं , लाथाळू नको पोरी. नाही काही तू ,असामान्य, नाही काही परी, कळेल तुलाही घासताना भांडी नवऱ्याच्या घरी. फिरतांना मागे तुझ्या, वर्ष गेली चार पुरी, तू अजूनही स्वप्नात येतेस पण पाठमोरी. नाव तुझं घेऊन, हसतात मला पोरं सारी, पण, त्यांना काय माहीत, आपल्यात होतं काही तरी. तुझ्याच, हाती आहे आता, माझ्या जीवनाची दोरी, अंग होईल काय माझं? तू जातांना सासरी. प्रेमाचा धागा माझा, तो होता जरी, एकेरी, तरीपण तूच दिली आहेस मला सुखद आठवणींची शिदोरी. #ashshil#tu#sunder#yogesh#kavita#prem#virha#attitude# all