पर्यावरण वाचवा,निसर्ग वाचवा, झाडे लावा,झाडे जगवा. कधीही जी संपणार नाही, अशी हिरवी संपत्ती जमवा. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्या कागदी पिशव्या वापरु याआणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया. वृक्ष लावा तुमच्या दारोदारी ... आरोग्य येईल आपल्या घरोघरी *जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* #collab #yqtaai चला तर मग लिहूया.