...गझल... बोलू कुणांस आता? शब्द माझे हरवलेले समजेल कोण भाषा? भाव अर्थ गोठलेले पायांस रोखणारा उभा धाक उंबऱ्याचा मुक्या पैंजणा आडोशी किती घाव वेचलेले निढळी करांस ठेवून वाट पाहते अधीरा ढळली उदास सांज घाट संयमी बुडलेले जपतो कशांस आता?कप्प्यात मोरपीस तुटले उगांच मोती धाग्यात माळलेले चुकले चुकार कोठे? कळपात वासरांच्या गलबलून जीव आला हंबऱ्यात बोललेले नसणार मी उद्याला भास कोरडा असेल छळले स्वतःस मीही नजरेत बोचलेले गावातला जुना तो आज पार पोरका भासे पिकली गळून गेली पानांत शोधलेले ©Shankar Kamble #Foggy #gazal #gazals #शब्द #शब्दरंग #विरह_वेदना #प्रेम