Nojoto: Largest Storytelling Platform

येईल का ती चव दूध, तूप, साखरीला घामाच्या गंधाने जी

येईल का ती चव दूध, तूप, साखरीला
घामाच्या गंधाने जी गोडी येते भाकरीला

स्वर्ग ऊरतो केवळ दोन बोट अंतरावर
निजता खाटेवर अंथरूण त्या वाकळीला

शितलता पांघरण्यास भटकते काहिली
अन् मस्त मधुर गारवा सुटतो झोपडीला

धुंडाळली कितीही हाॅटेल्स न् ढाबे तरी
खमंग वास फक्त चुलीवरच्या फोडणीला

बांधा माडी, बंगले, रचा आरास जिन्नसाची
शोभा ती आगळीच धाटणीच्या मांडणीला

कोणती उपमा सांगा लावायची आपण
घासातला घास वाटून देणा-या वाटणीला सुप्रभात लेखकहो 
आजचा विषय आहे
कष्टाची भाकर...
कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा 
#भाकर 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
येईल का ती चव दूध, तूप, साखरीला
घामाच्या गंधाने जी गोडी येते भाकरीला

स्वर्ग ऊरतो केवळ दोन बोट अंतरावर
निजता खाटेवर अंथरूण त्या वाकळीला

शितलता पांघरण्यास भटकते काहिली
अन् मस्त मधुर गारवा सुटतो झोपडीला

धुंडाळली कितीही हाॅटेल्स न् ढाबे तरी
खमंग वास फक्त चुलीवरच्या फोडणीला

बांधा माडी, बंगले, रचा आरास जिन्नसाची
शोभा ती आगळीच धाटणीच्या मांडणीला

कोणती उपमा सांगा लावायची आपण
घासातला घास वाटून देणा-या वाटणीला सुप्रभात लेखकहो 
आजचा विषय आहे
कष्टाची भाकर...
कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा 
#भाकर 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine