Nojoto: Largest Storytelling Platform

गोडवा साखरेचा... ऊस भरताना डोक्यावरची मोळी , अन्

गोडवा साखरेचा...

ऊस भरताना डोक्यावरची मोळी ,
अन् उचलत असलेली कवळी.
समोर असली की ओळखायचं ..?
ही फडकऱ्याची टोळी..

कधी अशामध्ये असतात 
परगावाहुन आलेली गबाळी.
तर ऊसाच्या फेऱ्या येस तोवर 
खुद तोडणी सुर करतात काही शेतकरीच मंडळी.

एकाच प्रकारची फडात नसतात इथे लोक 
तर असतात वेगवेगळी.
कोण वैरणीसाठी तर कोण लवकर लावणीसाठी
अशी शेतकऱ्यांची दिसते गडबड आगळीवेगळी.

दुकानात मिळणाऱ्या साखरेची
भरताना ग्राहका हो झोळी.
लक्षात असु द्या त्यामागे शेतकऱ्याची 
वर्षभराची मेहनत ही सगळी..

कवी - सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #शेतकरी. #गोडवा.#motivational.
#HeartBook
गोडवा साखरेचा...

ऊस भरताना डोक्यावरची मोळी ,
अन् उचलत असलेली कवळी.
समोर असली की ओळखायचं ..?
ही फडकऱ्याची टोळी..

कधी अशामध्ये असतात 
परगावाहुन आलेली गबाळी.
तर ऊसाच्या फेऱ्या येस तोवर 
खुद तोडणी सुर करतात काही शेतकरीच मंडळी.

एकाच प्रकारची फडात नसतात इथे लोक 
तर असतात वेगवेगळी.
कोण वैरणीसाठी तर कोण लवकर लावणीसाठी
अशी शेतकऱ्यांची दिसते गडबड आगळीवेगळी.

दुकानात मिळणाऱ्या साखरेची
भरताना ग्राहका हो झोळी.
लक्षात असु द्या त्यामागे शेतकऱ्याची 
वर्षभराची मेहनत ही सगळी..

कवी - सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #शेतकरी. #गोडवा.#motivational.
#HeartBook
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator