Nojoto: Largest Storytelling Platform

संध्याकाळी वाटेवर एक गळलं पान दिसलं काय झालं कुणास

संध्याकाळी वाटेवर एक गळलं पान दिसलं
काय झालं कुणास ठाऊक हे मन गहिवरलं

ऊचललं त्या पानाला, चटका लागला फार
तरळलं त्या क्षणाला सा-या जीवनाचा सार

श्वास आहे तोवरच मोल असतं असण्याला
नाही कुणी विचारत गळून पडल्या देहाला

म्हणूनच प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं
सुखदु:खाच्या वळणावर झोके घेत हसायचं

आज आहे, ऊद्या नसेल हे जग माझ्यासाठी
हो, जरा जगून घेते मी मनसोक्त माझ्यासाठी
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय.
आजचा आहे गळुन पडलेलं पान...
आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवडत असलेलं झाड गळुन किंवा वाळुन पडलं तर आपल्याला पण त्याचा त्रास होतो, होतो ना?
तसचं असतं मानवाचं मन कश्यात गुंतल ना कि गुंततचं जातं.
चला तर मग या विषयावर कविता,चारोळी,लेख कोणता ही प्रकार लिहीलेला चालेल.
यासोबतचं मी आज पासुन दिलेल्या कोलँब करिता चारोळी साठी वेगळे विजेते आणि कविते साठी वेगळे विजेते घोषित करणार आहे.