आपणचं ठरवल होत ना गं कि, एकमेकांची साथ कधीचं सोडायची नाही, पण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले, अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले.. कधीतरी विचार कर गं परत येण्याचा, दाखविलेलं एक तरी स्वप्न पूर्ण करण्याचं, मी काही नाही बोलणार तुला, तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर, मी स्विकारेन तुला सगळ्या तुझ्या अटी, सुख-दुःखा सहित, नको देऊस सुख मला, पण असं एकट तरी नको सोडून जाऊस. माहित आहे गं मला, तू फार जिद्दी आहे, नाही येणार तू परत तरी मी वाट पाहत राहीन तुझी, या जिवात श्वास असेपर्यंत, आणि श्वासाचा अंत होईपर्यंत. फक्त चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेऊन. वाट पाहतोय..