#सावडता सावडता.. एक दिवस अनाहूतपणे श्वास संपले माझे अन् मला स्मशानात नेऊन जाळलं गेले माघारी ते सारे आप्त सोयरे परतुन पूर्ण चिता जळपर्यंत कुणी थांबलं देखील नाही कवटी फुटली तेव्हासुद्धा एकानेही मागे वळून नाही पाहिलं मीच मजला श्रद्धांजलीपूर्वक भावफुल अर्पियलं...... राखेच्या ढिगाऱ्यात फक्त उरली हाडे एकलाच मी भुत होऊनी ती सावडत सावडत राहिलो कुठेच दिसेना गर्व पद प्रतिष्ठा पैसा तरीह राखेला खालीवर करत राहिलो...... डोक्यात होती कालपर्यंत ती सत्तेची धुंदी भिनली त्या धुंदीपाई कुणाला कधी मी भीक नाही घातली राखेला सावडत सत्ता शोधत राहिलो पण तरी हाडाला चिटकलेली धुंदी नाही दिसली...... राखेत काहीतरी शिल्लक हवं होतं मडक्यात कोंबता तरी आलं असतं हाडं काही तिथेच सोडावी लागली राखेत ऐश्वर्य शोधता आलं असतं...... मद मत्सर स्वप्न आशा श्वास नशा सावडता सावडता त्यातलं माझं आधीचं अस्तित्व शोधत राहिलो देवा..अरे किती आग पाखडशील हे देवाला विचारत विचारत कुठं गेलं सारं तेच त्या राखेत शोधत राहिलो...... राखेत ऊब धगधग शिल्लक होती तेव्हाच मग पूर्वज मग माझे मज सोबत न्यायला आले पाण्यात धुवून स्वच्छ मोकळं करून सोबत मजला कायमचे घेऊन गेले सावडता सावडता काही नाही उरलं अन् होतं तिथं जे काही उरलेलं तेही मग आपसुक मातीला मिळालं.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव