Nojoto: Largest Storytelling Platform

नाण्याला दोन बाजू तशाच प्रेमाच्याही फळतं त्याला फळ

नाण्याला दोन बाजू
तशाच प्रेमाच्याही
फळतं त्याला फळतं
नाही त्याला काहीच नाही

नदीला जसा पूर येतो
तसाच कोरडेपणाही
प्रेमाचेही असेच असते
नाही तेव्हा काहीच नाही

प्रेम म्हणून थांबतं का?
कुठे अडकून पडतं का?
प्रश्न जसा सोपा आहे
उत्तर तेवढे सोपे नाही

प्रेमाने जो गंजला नाही
तो प्रेमात भंगला नाही
कि जो प्रेमात गंजलेला
तोच प्रेमात रंगलेला?

कसे म्हणावे असे तरी
उत्तर आहे ह्याचे काही?
प्रेमात पडल्याशिवाय
कळेल तरी कसे काही?

प्रेम ही वाटेत पडलेली
वस्तू नाही की दानही नाही
प्रेम हे स्वाभाविक असतं
तसंच काहीसं दुराग्रही

म्हणून प्रेमाशिवाय अडतं का?
उत्तरादाखल मी म्हणते की
अडतं त्याचं सगळंच अडतं
नाही त्याचं काहीच नाही लेखकानों💕
आजचा विषय आहे
प्रेमाशिवाय अडलं का?
हा एक खुप सुंदर विषय असणार आहे
बघा काही सुचतयं का?
#प्रेमाशिवाय
#collab #marathiquotes #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
नाण्याला दोन बाजू
तशाच प्रेमाच्याही
फळतं त्याला फळतं
नाही त्याला काहीच नाही

नदीला जसा पूर येतो
तसाच कोरडेपणाही
प्रेमाचेही असेच असते
नाही तेव्हा काहीच नाही

प्रेम म्हणून थांबतं का?
कुठे अडकून पडतं का?
प्रश्न जसा सोपा आहे
उत्तर तेवढे सोपे नाही

प्रेमाने जो गंजला नाही
तो प्रेमात भंगला नाही
कि जो प्रेमात गंजलेला
तोच प्रेमात रंगलेला?

कसे म्हणावे असे तरी
उत्तर आहे ह्याचे काही?
प्रेमात पडल्याशिवाय
कळेल तरी कसे काही?

प्रेम ही वाटेत पडलेली
वस्तू नाही की दानही नाही
प्रेम हे स्वाभाविक असतं
तसंच काहीसं दुराग्रही

म्हणून प्रेमाशिवाय अडतं का?
उत्तरादाखल मी म्हणते की
अडतं त्याचं सगळंच अडतं
नाही त्याचं काहीच नाही लेखकानों💕
आजचा विषय आहे
प्रेमाशिवाय अडलं का?
हा एक खुप सुंदर विषय असणार आहे
बघा काही सुचतयं का?
#प्रेमाशिवाय
#collab #marathiquotes #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai