तू नसताना 🍁 तू सोबत नसली जरी , तुझा भास होणे काय नवीन नाही मला , पण तू सोबत असताना मनातल न बोलता येणं खूप छळतय मला..! . राहून जातय बरच काही बोलायचं , तुझ्या साठी मन माझ भांडतय मला , बोलून मोकळ व्हावं वाटत कधी कधी पण , तुझ्या उत्तरांच ओझ झेपणार नाही मला..! . तुझे हसणे , तुझे बोलणे , तुझे लाजणे , पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ आणतय मला , तसा प्रेमाच्या दूनियेपासून दूरच आहे मी , पण तुला पाहिलं की काय माहित काय होतात मला..! . तू तर व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यात , मी मात्र प्रत्येक कवितेतून साकारतोय तुला , ये कधी तरी तू स्वतः भेटायला एकांतात , लिहिलेलं सर्व काही ऐकवायच तुला.....! #शब्दांचा जादूगार Sid05🤡....✍️ ©Siddharth कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो #Dark