"लोकांच्या नजरा मला छळतात गं जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं बघून तुला ना, येई पाठी. शक्य नसे ते ,कुणाही साठी. रीत जुणी ही सांगू किती. सौंदर्य जेथे ,जडते प्रीती अलगद, माझ्याकडे पाहू नको गं भाव मनाचे ते कळतात गं.... लोकांच्या नजरा मला छळतात गं.... श्रुंगार कशाला ,या रुपाला देह लाजवील, रती यौवनाला मृग नयनी तू ,स्वैर बाला अग्नी काठी, मद्य प्याला काळोख्या राती फिरू नको गं ताऱ्यांची मनेही जळतात गं लोकांच्या नजरा मला छळतात गं.... कुठे ठेवू हा चंद्र झाकून राहील कसा तो नभा वाचून सुरेल जणू तू एक मैफील राहील कोण कसा मग गाफील आल्हाद अशी हसू नको गं संदर्भ फुलांचे जुळतात गं लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###