Nojoto: Largest Storytelling Platform

तुटलेली मौतिक माळ सगळे मोती ओघळले मी ओवायाला जाता

तुटलेली मौतिक माळ
सगळे मोती ओघळले
मी ओवायाला जाता
सारेच पुन्हा ते गळले

एक एक मोती म्हणजे
दवबिंदू आठवणींचा
विरघळून मोती गेले
पडता किरण प्रकाशाचा

गोठले हुंदके जेथे
पाऊल स्मिताचे पडले
त्या हलक्या स्मित रेषेने
दुःखाचे काटे गळले

मी डाव मांडुनी बसले
भूतभविष्याचा सगळा
एक एक करून सारे
हे अनुभव झाले गोळा

ओवून तयांना साऱ्या
मी पुन्हा माळ बनवली 
तेव्हा इतके हे घडले
भेळ अनुभवांची झाली 
०६/११/२०२२ @ १९:००

©उमा जोशी #उद्धववृत्त २-८-४ 
#माळ
तुटलेली मौतिक माळ
सगळे मोती ओघळले
मी ओवायाला जाता
सारेच पुन्हा ते गळले

एक एक मोती म्हणजे
दवबिंदू आठवणींचा
विरघळून मोती गेले
पडता किरण प्रकाशाचा

गोठले हुंदके जेथे
पाऊल स्मिताचे पडले
त्या हलक्या स्मित रेषेने
दुःखाचे काटे गळले

मी डाव मांडुनी बसले
भूतभविष्याचा सगळा
एक एक करून सारे
हे अनुभव झाले गोळा

ओवून तयांना साऱ्या
मी पुन्हा माळ बनवली 
तेव्हा इतके हे घडले
भेळ अनुभवांची झाली 
०६/११/२०२२ @ १९:००

©उमा जोशी #उद्धववृत्त २-८-४ 
#माळ