तु समोर आलीस की माझ्या श्वासाची गती वाढते हृदयाचे ठोके वाढतात मनात जे काही आहे ते सार सार तुला सांगुन टाकव अस वाटत पण तु कायमचीच दुर होनार नाहीस ना भीती वाटते । पण मला नेहमी वाटत तु एकदा तरी माझ्या डोळ्यात पाहाव. पण माझ्या डोळ्यातील आतुरता तुला कळलीच नाही . मी हाजार कविता लिहल्या आणि फाडून टाकल्या कदाचित तुला त्या आवडणार नाहीत म्हणून . त्या चुरगळलेल्या कागदांतले चुरगळलेले शब्द तुझी वाट पाहताहेत मला खात्री आहे की एक दिवस तु माझा सर्व कविता वाचेशील माझ्या स्वप्नात आहे तशीच माझ्या आयुष्यात येशील किती दूर तू तरी समोर तु मी श्वास घ्यावा तु श्वास व्हावा तुझ्या स्पर्शाने सखे या दगडाचा देव व्हावा । शिल्पा ताठे #love