गडे तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले मैफिलीत सुखाच्या ते गाणे दुःखाचे असे बरे नाही ठरले , मी रोखला श्वास जेव्हा सगळेच आले होते पण तुझे शेवटी येणे असे बरे नाही ठरले ।।१।। मी आणला प्रत्येक तारा तुझ्या स्वप्नांचा पण प्रलोभन तुझे आकाशाचे बरे नाही ठरले , मी साधला मेळ हळव्या भावनांचा , पण काळजाचे खेळ तुझे असे बरे नाही ठरले ।।२।। तू रुसलीस जेव्हा मीही रूसलो होतो तू हसलीस जेव्हा मीही हसलो होतो , मग अबोल तुझे वागणे असे बरे नाही ठरले तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले ।।३।। तू आलीस जेव्हा मी एकटाच होतो तू गेलीस तेव्हाही मी एकटाच होतो , पण वियोगात मला सोडणे असे बरे नाही ठरले तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले ।।४।। - गोविंद पोलाद