ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च गोर गरीबात वाटावा, मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून, त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर ताव मारुन. मग या दिवाळीत फटाक्यांना नाही म्हणत त्याऐवजी पुस्तके घ्या. अशाप्रकारे आजचं चँलेंज आहे फटाक्यांना नाही म्हणत त्यांच्यावर घोषवाक्ये बनवा. उदाहरण.फटाके नको पुस्तके घ्या. फटाक्यांच्या रोषणाई ऐवजी दिव्यांची रोषणाई करा.