#श्वास बुक खिशातून पन्नासची एक नोट जरी पडली तर बेचैन होणारा माणूस आयुष्याची वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही..अगदी बिंधास्तपणे जगतो.. काय दुर्दैव आहे ?? आजच्या काळात स्मशानभूमीची सुरक्षा किती मजबूत असते हे तर विचारूच नका साहेब..अहो पैसा तर फार दूरची गोष्ट आहे इथं देव जन्माला येताना सोबत घेऊन आलेला श्वासही मरताना सोबत घेऊन जाऊ देत नाही..मग तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वर पर्यंत ओळख असली तरी.. काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो अन् रात्रंदिवस वय पितो व आपलं आयुष्य खातो व माणूस समजतो मी जगतोय.... माणूस खाली बसून संपत्ती मोजतो.. काल किती होती व आज ती संपत्ती किती वाढलीय.. अन् वरती तो हसणारा देव मात्र सतत माणसाचे श्वास मोजतो.. काल किती होते ? आज किती उरले व उद्याची श्वास घ्यायची ग्यारंटी व संधी याला द्यावी का ?? तर चला..उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवून जगून घेउया..पासबुक व श्वास बुक दोन्ही रिकामे असल्यास भरावेच लागतात. पासबुकात रक्कम व श्वासबुकात सत्कर्म....म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत हसत घालवा..रडुन वा खचून तरी काय साध्य होतं ?? " काळाचा कावळा बोंबलून सांगे जिथं अती तिथं मातीच झाली.." @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव