अविरत वाहणारी एक नदी.. ऐलतिरावर मी उभा., पलीकडे तू किनाऱ्यावर एकही नाव नाही... नदीवर एकही पुल नाही... किनारे धरून पुढे जावं तर अफाट समुद्र लागेल पोहता तुलाही येत नाही.., मलाही.. आणि भेट जिवंतपणीच व्हायला हवी... अशा वेळी नदी आटण्याची वाट बघावी का..? चालत जावं तेच दोन्ही किनारे धरून. तिच्या उगमाकडे.. जिथून तिचा जन्म झाला त्या पल्याड कुठेतरी जमीन भेटत असतेच की तिथेच थांबू... त्या प्रेम नदीच्या उगमापलिकडे मैत्रीच्या टप्प्यावर... प्रत्येक नदीवर बांध घालायचा नसतो... ©Krushnarnav #उगमापल्याड #अबोल_प्रेम #Sea