गंधात कामिनीच्या, भरला वसंत आहे वेडावते दुरूनी,भलतीच खंत आहे सांभाळ बालिके तू, आता जरा स्वतः ला शृंगार मांडण्याला..थोडी उसंत आहे गर्वात सुंदरी ती,जाई निघून कोठे..? मोहात पाडण्याची , इच्छा अनंत आहे गालावरी सखीच्या, गर्वात तीळ शोभे राहे समीप इतका, तो भाग्यवंत आहे निष्ठूर रूपगर्वी, ती चंचला दिवानी हृदयात खोल इतकी, का शोभिवंत आहे टेकून नित्य माथा, भक्तीत रंगले मी कळले मला न तेव्हा, खोटा महंत आहे नासून जात आहे..हापूस कोकणाचा राजा जरी फळांचा... तो नाशवंत आहे ©Rohini Pande #रोही