वास्तवाला बाजूला सारून, स्वप्नात थोडं रमायचंय, पुन्हा एकदा मला, लहान होऊन जगायचंय... व्हायचंय मला ते बाळ, सर्वांना हवं हवं वाटणारं... स्वतः काहीही न करता, इतरांना लळा लावत बसणारं... जायचंय पुन्हा शाळेत, मागच्या बाकावर बसायला... गुरुजींची पाठ वळली, की त्यांचीच नक्कल करत हसायला... खेळायचंय मला मनसोक्त, दिवसभर आमच्या अंगणात... धपाटे खाऊन आईचे, वेळ जावा पुन्हा रडण्यात... मैत्री करायची आहे पुन्हा, निर्मळ मनाने जपलेली, एकत्र राहण्याचा वादा त्यात, कुठलाही स्वार्थ नसलेली... हे सगळं मला करायचंय, पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात... हरवलेलं बालपण शोधायचंय, दूर निघून गेलंय स्वतःला सिद्ध करण्यात... ओझं न घेत पाठीवर, फक्त आठवणीत भिजायचंय, पुन्हा एकदा मला, लहान होऊन जगायचंय... #HappyChildren'sDay - स्वप्नील हुद्दार #ChildrensDay