किती छान होईल ना..?? पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो आयुष्याची पाने अशीच पलटली तर.. किती छान होईल ना..?? स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर.. किती छान होईल ना..? काही लोक स्वार्थासाठी शोधतात मला पण निस्वार्थीपणे कुणी माझ्या शोधात आलं तर.. किती छान होईल ना..?? मन मारून काळीज कुणीही घेऊन जाईल माझे पण मन जिंकून काळीज नेणारी भेटली तर.. किती छान होईल ना..?? जिवंतपणी तर सगळ्यांना मी हसवत ठेवीन पण माझ्या मरणावरही कुणी येणाऱ्या अश्रूतही हसले तर.. किती छान होईल ना..?? आत्माही माझा असाच हसतंच तेव्हा सगळ्यांना साद देऊन जाईल पण नंतर त्या राखेतही मला कुणी शोधत बसले तर.. किती छान होईल ना..?? ©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव..