बाप हा बापच असतो.. लहानपणापासून चांगलं-वाईट समजावून योग्य ती वाट निवडण्यासाठी स्वातंत्र्य देतो.. एखादी चूक झाल्यावर त्याबद्दल मला ती परत होणार नाही याविषयी पूर्ण मार्गदर्शन करतो.. आयुष्यात जगण्याच, हवे तसं जगू देतो.. अपयशात आधार आणि होशील यशस्वी म्हणत प्रोत्साहन देतो... आईसारखे प्रत्येक आजारावरील औषध आणि आनंदामागील खरे कारण असतो.. लेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना विसरतो.. कुटुंबातील प्रत्येकासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचा अखंडित झरा वाहतो.. अनेकजण जीवनात प्रेरणा देतात पण जीवनातील पहिले आणि शेवटचे प्रेरणास्थान हा बापच असतो... गरजेच्या वेळी हाक न देता पाठीमागे खंबीरपणे उभा बापच असतो.. स्वतःच्या दुःखाची तीळमात्रही जाणीव न होऊ देता आम्हाला सदैव आनंदात ठेवतो.. खरच बाप हा बापच असतो.. #fatherlove #marathiquotes #marathikavita #baap #vadil #prem #backbone #family