#आयुष्य..एक रंगमंच मनाची थकावट जाईल असा या धरेचा रंगमंच हवाय ह्या धावपळीच्या आयुष्यात मोकळा श्वास हवाय चेहरे नव्हे तर मन वाचण्या पुरेसा वेळ हवाय मुखवट्यापासून दूर कुठेतरी शांत एकांत हवाय मन भरलंय मोठेपणाने अहंकारही मिटलेला हवाय खोट्या प्रतिष्ठेचा बोजा बाजूला ठेवलेला हवाय माणूस म्हणूनही आता एक स्वल्पविराम हवाय पक्षांसारखं विहरण्या मुक्त आकाशाचा मधुबंध हवाय.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर