प्रतिज्ञा एक प्रतिज्ञा केली राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीने, शिवबाला उत्तम राजा घडविण्याची एक प्रतिज्ञा केली बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रतिज्ञा केली क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी, बहुजनांना अंधःकारातून प्रकाशमान करण्याची एक प्रतिज्ञा केली ज्ञान माउली सावित्रीने, महिलांच्या उद्धारासाठी एक प्रतिज्ञा केली या दोन्ही उभयंत्यानी, मुलींना व अस्पुश्य मुलांना शिक्षण देण्यासाठी एक प्रतिज्ञा केली राजर्षी शाहू महाराजांनी, शेतकऱ्यांना संरक्षण व गोर गरीब मुलांच्या शैक्षणिक आरक्षणासाठी एक प्रतिज्ञा केली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्षांनुवर्षे चालत आलेली गुलामगिरी नष्ट करून या देशात समता, बंधुता, स्वतंत्रता व लोकशाही प्रस्थापित करण्याची एक प्रतिज्ञा केली त्यागमूर्ती रमाई माउली ने आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि मी प्रतिज्ञा करते, या महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन माणुसकी धर्म जपण्याची - ज्योती किरतकुडवे (साबळे) ©Jk #प्रतिज्ञा