*गुलमोहर* त्या रणरणत्या उन्हात गुलमोहर रक्तलालिमा लेऊन सर्वांगावर बहरून आला नव्याने अंगोपांगी भासतो जणू तो ध्यानस्त योगी निष्पर्ण जरी तो झाला असला फुलाफुलांनी खूपच डवरला लपेटल्या ज्वाला सा-या देहावरती चिताच पेटली जणू धगधगती ग्रीष्मातही त्याचे खूलते किती रूप पानगळ होऊनही दिसेना कुरूप वर्ण त्याचा कसा गर्द लाल भडक आग अोकतो जणू सुर्यावरच तडक डोईवर घेई तप्त ग्रीष्माच्या उन्हाला सावली शीतल तरी देई वाटसरूला डोईवर बांधला जणू शेला लाल लाल दिमाखात उभा जसा राजाचा महाल *किरण क्षीरसागर* *नाशिक* #NojotoQuote