#देह नश्वर आत्मा तोचि असे अंशईश्वर.... कुणी आधी कुणी नंतर देवाकडून जन्म घेऊनी पुन्हा निजधामाला जातसे परी एक तो आत्मा अमर जन्म न घेतो नाश न होतो एकच आत्मा असे चराचर मनात माझ्या असेल अत्तर गंध पखरतो तोच निरंतर म्हणून हसतो मला पाहुनी अनोळखी असे कुणी पत्थर स्पर्शाचे हो कसे आकलन कुठून येती शब्दांचे ते अमाप घन जीवास चेतना कशी मिळे ती जरा करावे याचे सम सकलांनी चिंतन ओठावरचे हसू ते लाघवी क्षीण वेदना ती करी मानवी कशी समजते अलगद उरी सलणारी वेदना दुजा कुणाची बात सहज जाणवी अपुल्या मना आत्म्याचे ते आत्म्याशी अतुट असे विलक्षण बंधन कुणा न कळले कोण चिरंतन परमात्मा जो देही वसतो सहज सोडतो तो हे देही बंधन मुक्ती मिळते मग ती देहाला भोग वेदना त्या साऱ्या असे आत्म्याला हा देह सोडुनी जाई आत्मा दुसऱ्या देही पुन्हा जगणे असे नित्य निरंतर ते आत्म्याला परमात्म्याशी तदाकार जर झाला आत्मा नसे मग तयास अंतर तरी कदाचित मिळेल मुक्ती आत्मा परमात्मा मिटेल मग अंतर @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #काया_विठ्ठल_आत्मा_पांडूरंग